दिल्लीतील नजफगडमध्ये सलूनमध्ये गोळीबार! २ ठार

नवी दिल्ली- दिल्लीतील नजफगड येथील इंद्रा पार्कमधील एका सलूनमध्ये काल भरदिवसा गोळीबार झाला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. सलूनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या गोळीबाराची घटना कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावरदेखील व्हायरल झाला. सोनू आणि आशिष अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही नजफगड भागातील नागली सकरावती येथील रहिवासी होते.
नजफगड येथील सलूनमध्ये दोन अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी सलूनमधील ग्राहकावर गोळीबार केला. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या गोळीबारात सलूनमधील दोनजण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ही घटना भरदिवसा झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी सलूनमधील सोनू आणि आशिष या दोघांवर गोळीबार केला. सोनूच्या डोक्यात एक गोळी लागली तर आशिषच्या डोक्यात तीन आणि छातीत एक गोळी लागली. जुन्या वादातून गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेबद्दल या दोन्ही तरूणांच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top