दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेवर ४२५ उत्सव विशेष गाड्या

मुंबई :

दिवाळी आणि छटपूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेवर यंदा ४२५ उत्सव विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे सुमारे ३ लाख प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. यामध्ये सर्वाधिक उत्सव विशेष गाड्या नागपूर, अमरावती आणि कोल्हापूरसाठी चालवण्यात येत आहेत.

दिवाळी सणानिमित्त मुंबईहून बाहेरगावी जाणार्या प्रवाशांची संख्लांया मोठी असते. रेल्वेचा प्रवास तुलनेने स्वस्त आणि आरामदायी असल्याने प्रवासी रेल्वेला प्राधान्य देतात. त्यामुळे मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, हैदराबाद दिल्ली, बनारस, पाटणा आदी मार्गांवर नियमितपणे धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने तब्बल ४२५ उत्सव विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे.

उत्सव स्पेशल गाड्यांमध्ये कोल्हापूर- ११४, नागपूर-अमरावती- १०३, दानापूर- ६०, थिविम-मंगळूर- ४०, कानपूर-वाराणसी-गोरखपूर- ३८, समिस्तीपूर-छापरा-हटिया-३६, इंदूर-१८, नांदेड- १ या गाड्यांचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top