देवळालीत एकाच ठिकाणी तीन बिबटे दिसल्याने दहशत

देवळाली कॅम्प – दारणा नदी काठावर वसलेल्या देवळाली कॅम्प परिसरात बिबटयांचा वास्तव्य असून स्टेशन वाडीलगतच्या नाल्याजवळ एकाच ठिकाणी तीन बिबट्यांचे दर्शन घडल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.देवळाली कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे असल्याने बिबट्यांसाठी ते लपण्याचे ठिकाण बनले आहे.दारणा नदीकाठच्या विजयनगर,, वंजारवाडी, लोशिंगे, लहवित, भगूर, दोनवाडे, राहुरी, नानेगाव, संसरी, शेवगे या पट्ट्यासह देवळालीच्या विजयनगर, धोंडीरोड, लॅम रोड या भागांतही बिबट्यांचे वास्तव्य नेहमीच आढळून आले आहे. दरवर्षी जानेवारी ते एप्रिल या दरम्यान या ठिकाणी बिबट्यांचा वावर असतो.
दारणा पट्टयात सध्या उसतोड सुरू असल्याने बिबटे स्टेशनवाडी परिसरात मानवी वस्तीमध्ये येत आहेत.त्यामुळे या परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top