देवी भवानीच्या गोंधळानिमित्त मसुरेत २९ मार्चला कबड्डी स्पर्धा

सिंधुदुर्ग – मालवण तालुक्यातील मसुरे डांगमोडे येथील देवी भवानीच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त २९ मार्च रोजी रवळनाथ मंदिर येथील मैदानावर जिल्हास्तरीय पुरुष व महिला ‘निमंत्रित संघांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धा जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि मालवण तालुका असोसिएशन यांच्या सहकार्याने आणि नवतरुण मित्रमंडळ, मसुरे डांगमोडे यांच्यातर्फे होणार आहेत.

या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला पाच हजार रुपये उपविजेत्याला तीन हजार, तृतीय व चौथ्या क्रमांकाला प्रत्येकी पंधराशे रुपये व शिवाजी गंगाराम ठाकुर स्मृती चषक देण्यात देण्यात येणार आहे.उत्कृष्ट चढाई, क्षेत्ररक्षक व खेळाडू यांना रोख रक्कम आणि चषक देण्यात येईल.सहभागी संघांच्या खेळाडूंची भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छुक संघांनी नावे मसुरे येथील नितीन हडकर किंवा दत्तप्रसाद पेडणेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नवतरुण मित्रमंडळ आणि डांगमोडे ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top