देशातील लोकशाही धोक्यात! सोनिया गांधी यांचे टिकास्त्र

जयपुर- देशाची लोकशाही आज धोक्यात असून नरेंद्र मोदी यांची नकारात्मकता देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळवत असून लोकशाहीला धोका निर्माण करत आहे, अशी टीका काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केली आहे. त्या आज जयपूर इथे काँग्रेसच्या जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, देशाची लोकशाही धोक्यात आहे. संवैधानिक संस्था नष्ट केल्या जात असून संविधानच बदलण्याचा घाट घातला जात आहे. काँग्रेसचा जाहीरनामा हा हुकुमशाहीला दिलेले उत्तर आहे. विरोधी पक्षातल्या उमेदवारांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजपा अनेक प्रयत्न करत आहे. सरकार गेल्या दहा वर्षात रोजगारी, महागाई, आर्थिक प्रश्न आणि विषमतेच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी झाले आहे. यावर त्यांनी गेल्या दहा वर्षात काहीही केलेले नाही. आपण सगळ्यांनी मिळून अवतीभवती होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लढून न्याय मिळवला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top