देशात यंदा सरासरी १०४ टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली
देशात यंदा जून ते सप्टेंबर काळात सरासरीच्या १०४ टक्के पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पर्जन्यमान सरासरी ८७ सेंटिमिटर राहिल.
विश्ववृत्तीय प्रशांत क्षेत्रात अल नीनोची स्थिती मध्यम असून या मोसमाच्या दूसऱ्या भागात ला नीना विकसित होण्याची शक्यता आहे. हिंद महासागर, डायपोल, उत्तर ध्रुवावर असलेले बर्फाचे आवरण या साऱ्या गोष्टींचा परिणाम भारतातील मोसमी पावसावर होत असतो. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातील अनुकुल घडामोडींमुळे यंदाचा मोसमी पाऊस सरासरी पर्जन्यमानापेक्षा १०४ टक्के अधिक राहणार आहे.
निवडणूकीच्या काळात देशातील पूर्वोत्तर भागात मान्सून पूर्व पाऊस येण्याची तसेच काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गेल्याच आठवड्यात स्कायमेटनेही अशाच प्रकारचा अंदाज वर्तवला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top