दौडजला कंटेनर कारचा अपघात! १ ठार, २ जखमी

पुणे

पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील दौंडज (ता. पुरंदर) येथे कंटेनर आणि कार यांच्या अपघात झाला. या अपघात नरेंद्र नारायण घाडगे या कारचालकाचा मृत्यू झाला, तर सचिन नंदकुमार बोराटे, दत्तू खंडू सोनकांबळे हे दोघे जखमी झाले. हा अपघात शनिवारी रात्री ११.४५ च्या सुमारास झाला. कंटेनर जेजुरीकडे जात होता, तर कार जेजुरीहून येत होती.

दौंडजमधील विद्यालयासमोर हा अपघात झाला. यात कारचा वरचा भाग कंटेनरच्या पाठीमागील बाजूत अडकला. कंटेनर तसाचा पुढे निघून गेला. जोराच्या आवाजामुळे स्थानिकांना घटनेची माहिती मिळाली. यावेळी तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. दौंडज पोलीसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी अपघातातील जखमींना जेजुरी येथील रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी कंटेनरचालक अरमन मेहदीसहन खान विरोधात दत्तू खंडू सोनकांबळे यांनी वाल्हे पोलीस दुरक्षेत्रात फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास वाल्हे दुरक्षेत्रातील हवालदार दीपक काशिद करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top