नगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू

अहमदनगर –
अहमदनगर जिल्ह्यातील लोणी परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा संचार सुरू असताना घराजवळील शेतात खेळत असलेल्या ९ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्याने लोणी परिसरात भीतीचे वातावरण आहे. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गावातील ही धक्कादायक घटना असून अथर्व प्रवीण लहामगे असे मृत मुलाचे नाव आहे. मुलगा सापडत नसल्याने त्याचा शोध घेतला. त्यानंतर रात्री दहा वाजता मुलाचा मृतदेह सापडला. अनेक दिवसापासून बिबट्याचा लोणी परिसरात मुक्त संचार सुरू असून याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती देत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. या घटनेनंतर नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top