नवाज शरीफ पाकिस्तान सोडणार लष्करप्रमुख मुनिर यांचा आदेश

इस्लामाबाद- पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे शरीफ यांचा ४५ वर्षांचा राजकीय प्रवास आता थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तान सोडल्यानंतर ते लवकरच लंडनला परततील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवाज शरीफ हे प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत ते लंडनला परतण्याची आपली योजना जाहीर करतील. पण हा नवाज यांचा राजकीय निरोप असणार आहे. नवाज लंडनला परतल्याने लष्कर प्रमुखांची नेत्यांवरील पकड आणखी मजबूत होईल. इम्रान खान आधीच तुरुंगात आहेत. इम्रान यांना आतापर्यंत २४ पैकी ५ प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना कमाल शिक्षा १४ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या नवाज हे मानसेहरा मतदारसंघातून पराभूत झाले. ते लाहोरमधून ५० हजार मतांनी पिछाडीवर होते, पण त्यांना नंतर ८० हजार मतांनी विजयी घोषित करण्यात आले. म्हणजे नवाज शरीफ यांचा जनाधार कमी झाला आहे, हे त्यांनाही कळले आहे. नवाज शरीफ यांची मुलगी मरियम शरीफ यांना पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. बंधू शाहबाज शरीफ सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे लष्कराने नवाज शरीफ यांना स्पष्टपणे सांगितले आहे की,आता त्यांचे कुटुंब राजकीयदृष्ट्या स्थिरस्थावर झाले आहे. त्यामुळे त्यांनी पाकिस्तान सोडावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top