नवी मुंबईतील बसेसमध्ये मोबाईल वापरावर निर्बंध

नवी मुंबई- मुंबई महापालिकेतील बेस्टच्या धर्तीवर आता नवी महापालिका परिवहन महामंडळाने आपल्या बसमधील प्रवाशांकडून मोबाईल फोन वापरावर कठोर नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. एनएमएमटी प्रशासनाने जारी केलेल्या नवीन निर्देशात प्रवाशांना एनएमएमटी बसमधून प्रवास करताना मोबाइल फोनवर मोठ्याने बोलणे, मोठ्या आवाजात गाणी वाजवणे किंवा मोठ्या आवाजात व्हिडिओ पाहण्यास निर्बंध घातले आहेत.
शहरातील बसेसमधून प्रवास करताना मोबाईलच्या आवाजामुळे होणारी सहप्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे एनएमएमटीचे व्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी सांगितले. सार्वजनिक उपक्रमाच्या या बसमधून प्रवास करताना अनेक प्रवासी मोबाईलवर मोठमोठ्याने बोलतात. तसेच व्हिडिओ आणि गाणी पाहताना मोठा आवाज करतात.त्यामुळे सहप्रवासी त्रस्त होतात अशा तक्रारी वाढल्या होत्या.या तक्रारींना प्रतिसाद म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे आता या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना इयरफोन न वापरता स्मार्टफोनवर ऑडिओ ऐकणे किंवा व्हिडिओ पाहणे,तसेच मोठमोठ्याने बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच याबाबतच्या सूचना सर्व चालक,वाहक आणि पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांना देत त्याची त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top