नवी मुंबईतून पुढच्यावर्षी पहिले विमान उड्डाण होणार

नवी मुंबई – भारतातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे.हे काम वेगाने सुरू असून आतापर्यंत ६३ टक्के काम पूर्ण झाले आहे.त्यामुळे ३१ मार्च २०२५ मध्ये या विमानतळावरून विमानाचे पहिले टेकऑफ म्हणजे उड्डाण होईल,असा दावा सिडकोने केला आहे.

येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत विमानांच्या उड्डाणाची चाचणी घेणे अपेक्षित आहे.नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अदानी समूहाद्वारे रायगड जिल्ह्यातील पनवेलनजीकच्या १६०० हेक्टर जागेवर हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारला जात आहे.यात सिडको ही नोडल एजन्सी म्हणून काम पाहत आहे.या प्रकल्पाचा अपेक्षित खर्च १९ हजार ६०० कोटी रुपये इतका आहे.सध्या पहिल्या दोन टप्प्यांच्या कामावर भर दिला जात आहे.

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल हे यासाठी आग्रही आहेत. त्यामुळेच व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारताच सर्वप्रथम त्यांनी विमानतळ प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली.हा ग्रीनफिल्ड प्रकल्प ५ टप्प्यात पूर्ण होणार आहे.पहिल्या दोन टप्प्यात वर्षाला दोन कोटी प्रवासी क्षमता असणार आहे. पहिल्या टप्प्याचे ६३ टक्के काम पूर्ण झाल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.पाच टप्पे पूर्ण झाल्यावर विमानतळाला चार टर्मिनल आणि दोन धावपट्ट्या असतील.तसेच विमानतळावर उत्तम दर्जाचे रस्ते,रेल्वे,मेट्रो आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top