निलेश लंकेंनी मध्यरात्री थोरातांची भेट घेतली

अहमदनगर- अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीने निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निलेश लंके यांनी संगमनेरमध्ये काल मध्यरात्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. संगमनेर शहरातील सुदर्शन या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी लंकेंनी बाळासाहेब थोरात यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी दोघांमध्ये जवळपासव दीड तास चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. भेटीनंतर लंकेंनी सांगितले की, ‘राज्यातील सुसंस्कृत नेता अशी बाळासाहेब थोरात यांची ओळख आहे. त्यांनी निवडणुकीला सामोरे कसे जायचे याबाबत मार्गदर्शन केले.’ या भेटीबाबात बाळासाहे थोरात यांनी सांगितले की, निलेश लंके हा छोटा कार्यकर्ता असला तरी फार गुणी आहे. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा हा कार्यकर्ता आहे. नगर दक्षिणची लढाई ही ‘श्रीमंत विरुद्ध गरिबी’ अशी आहे. यात निलेश लंके विजयी होतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top