नीरा-लोणंद दुहेरीकरणासाठी ९ दिवस पॅसेंजर गाड्या रद्द

मिरज – नीरा-लोणंद स्थानकादरम्यान ब्लॉक घेऊन रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. यासाठी १२ ते २१ ऑक्टोबरदरम्यान ९ पॅसेंजर रेल्वे गाड्या पूर्णपणे रद्द तर काही अंशतः रद्द व काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. नवरात्र व दसऱ्याच्या काळात रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

पुणे विभागात पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील नीरा-लोणंद स्थानकादरम्यान ब्लॉक घेऊन रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी विविध तांत्रिक कामांसाठी १२ ते २१ दरम्यान काही पॅसेंजर व डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.पुणे-फलटण, लोणंद-फलटण व पुणे-सातारा या डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. २१ व २२ ऑक्टोबर रोजी सुटणारी पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस कोल्हापूर ते सातारापर्यंतच धावेल. त्यामुळे ही गाडी पुणे-सातारा-पुणे अशी रद्द राहील. २२ रोजी सुटणारी मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून नियमित वेळेऐवजी दोन तास उशिरा म्हणजेच सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी सुटेल. तर कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून नियमित प्रस्थानाऐवजी अडीच तास उशिरा म्हणजे सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. ब्लॉकमुळे १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान सुटणारी कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेसही विलंबाने धावेल. २१ ऑक्टोबर रोजी चंदीगडहून सुटणारी चंदीगड यशवंतपूर एक्स्प्रेस-पुणे ते सातारादरम्यान विलंबाने धावणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top