पंतप्रधान मोदी १७ डिसेंबरपासून वाराणशीच्या २ दिवसीय दौऱ्यावर

वारासणी- पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 डिसेंबरपासून वाराणसीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यातेसेवापुरीच्या बर्की गावात जाहीर सभा घेणार आहेत. 900 कोटींहून अधिक किमतीचे प्रकल्पांचे नरेंद्र मोदी उद्घाटन करणार आहेत.
पंतप्रधान मोदी 17 डिसेंबरला दुपारी 4 वाजता वाराणशीला पोहोचतील. बाबतपूर विमानतळावरून ते नादेसर येथील कटिंग मेमोरियलच्या मैदानावर दाखल होतील. या मैदानावर मोदी विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर येथून ते नमो घाटावर जातील आणि काशी तमिळ संगमचे औपचारिक उद्घाटन करतील. त्यानंतर बरेका येथे ते रात्रीचा मुक्काम करतील. 18 डिसेंबरला सेवापुरीच्या बर्की गावात नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. येथून वाराणसीतील दोन डझनहून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन करतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top