पडळकर चप्पलफेक प्रकरण फलटणमध्ये बंदची हाक

सातारा – धनगर समाजाचे नेते व विद्यमान विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात उद्या फलटण बंदची हाक देण्यात आली आहे. काल इंदापुरातील संविधान चौकात ओबीसी समाजाकडून रास्तारोको करण्यात आले. यावेळी चप्पलफेक करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी पडळकर यांच्या समर्थकांनी केली. दरम्यान, पडळकर उद्या ११ वाजता अधिवेशनावर इशारा मोर्चा काढणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top