पनवेल तालुक्यात २१ गावे वाड्यांवर भीषण पाणीटंचाई

पनवेल –

पनवेल तालुक्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तालुक्यातील २१ गावांत पाणीटंचाई असून टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. त्याचे प्रस्ताव पनवेल उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार याना पाठविण्यात आले आहेत. महिलावर्गात तीव्र नाराजी असून पनवेल पाणीपुरवठा विभागाकडून फेब्रुवारी महिन्या अखेर ५० टक्के जल जीवन मिशन योजना यशस्वी झाली आहे. तर मे महिन्यात तालुक्यात १०० टक्के ही योजना कार्यरत होणे अपेक्षित होते. मात्र ती बारगळल्याने पनवेल तालुक्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे

पनवेल तालुक्याचे नागरीकरण वाढत असून मागणीच्या प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही. त्यातच पाणी चोरी आणि गळतीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे तालुक्यातील काही गावांना अपुरा, कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी नेहमीच्याच आहेत. पनवेल तालुक्यात जल जीवन मिशन योजना यशस्वी झाली असती तर पनवेल तालुका पाणीटंचाई मुक्त झाला असता. पण तालुक्यात जल जीवन मिशन योजनेची पाच-सहा कामे एकाच ठेकेदाराला दिल्याने ही योजना पूर्णतः यशस्वी होवू शकली नाही. पनवेल तालुका पाणी टंचाईमुक्त करण्यासाठी पनवेल पंचायत समितीच्या वतीने प्रत्येक वर्षी प्रयत्न केले जात असतानाही रायगड जिल्हा परिषदेकडून उपाययोजना केल्या जात नसल्याने पनवेल तालुक्यांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील दुर्गम भगत विंधन विहिरीवर भर दिला जात आहे. तसे प्रस्तावही पाठविण्यात येत आहेत. पण रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने पनवेल तालुक्याला तीव्र पाणीटंचाईची झळ पोहचत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top