पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदा हिंदू महिला निवडणूक लढणार

इस्लामाबाद- पाकिस्तानात ८ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मात्र पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एक हिंदू महिला देखील निवडणूक रिंगणात उतरून आपले भविष्य आजमवणार आहेत.सवीरा प्रकाश असे या महिलेचे नाव असून तिने निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सवीरा प्रकाश या पेशाने डॉक्टर आहेत .त्यांनी बिलावल भुत्तो झरदारी यांच्या पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या तिकिटावर खैबर पख्तूनख्वामधील बुनेर जिल्ह्यातून पीके -२५ या मतदारसंघातून सर्वसाधारण गटातून उमेदवारी अर्ज भरला आहे.सवीरा यांचे वडील पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सदस्य आहेत.
आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सोमवारपर्यंत २८ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.विशेष बाब म्हणजे सवीराचे वडील ओम प्रकाश हे देखील सेवानिवृत्त डॉक्टर आहेत आणि गेल्या ३५ वर्षांपासून पीपीपीचे सदस्य आहेत. सवीरा यांनी २०२२ मध्ये अबोटाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजमधून पदवी घेतली आहे. आणि बुनेरमधील पीपीपीच्या महिला मोर्चाच्या त्या सरचिटणीस आहेत. महिला हक्कासाठी त्या पाकिस्तानमध्ये कार्यरत आहेत.पाकिस्तान निवडणूक आयोगाने नुकत्याच केलेल्या सुधारणांमध्ये सर्वसाधारण जागांवर ५ टक्के महिला उमेदवारांना आरक्षित केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top