पाकिस्तानात महागाईचा कहर अंडी तब्बल ४०० रुपये डझन

लाहोर- पाकिस्तानात महागाईने कहर केला आहे. लाहोरच्या बाजारातील अंड्याचा भाव डझनामागे तब्बल ४०० रुपये झाला आहे. कांदाही २५० रुपये किलो दराने मिळत आहे.

सरकारने कांद्याचा दर १७५ रुपये ठरवून दिला आहे. तरीपण प्रत्यक्ष बाजारात कांदा २५० रुपये किलो दराने विकला जात आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. चिकनचा दर किलोमागे ६१५ रुपये झाला आहे.
सरकार महागाई रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. पण सरकार त्यात अपयशी ठरत आहे. महागाईमुळे पाकिस्तानात साठेबाजी आणि नफेखोरी वाढत चालली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top