पाकिस्तानात महागाईदर २५ टक्क्यांवर जाणार

इस्लामाबाद-पाकिस्तानात महागाई दर अव्वाच्या सवा वाढला आहे.आशियाई विकास बॅंकेच्या एका नव्या रिपोर्टच्या माहितीनुसार, पाकिस्तानात आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये महागाई दर २४ टक्क्यांवर पोहोचणार आहे.

आशियाई विकास बॅंकेच्या
माहितीनुसार,पाकिस्तानात महागाई दर हा आशियात सर्वात जास्त आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था चौथ्या सर्वात मंद गतीने म्हणजेच १.९ टक्क्यांनी वाढू शकते, असा अंदाज आहे. आशियाई डेव्हलपमेंट आऊटलुकने पुढील वर्षासाठी निराशाजनक चित्र सादर केले.पाकिस्तानात जवळपास ९८ टक्के मिलियन लोक हे गरीब आहेत.या देशात पुढील आर्थिक वर्षासाठी महागाई दर १५ टक्के राहण्याचा अंदाज आहे.बँकेने पाकिस्तानचा वृद्धी दर २.८ टक्के राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. जी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी पाचव्यांदा सर्वात कमी असेल. चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानात महागाई दर २५ टक्के होण्याची अपेक्षा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top