पाचगणी शहरात रानगवा नागरिकांची तोबा गर्दी

पाचगणी- आतापर्यंत साताऱ्यातील पाचगणीच्या जंगल भागात अनेकदा रानगव्याचे दर्शन घडले आहे.मात्र काल एक रानगवा सोमवारी चक्क पाचगणी शहरात हिंडताना दिसून आला.अचानक दाखल झालेल्या या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. अनेकजण या गव्याचे मोबाईलमध्ये फोटो टिपत होते.

पाचगणी-पाचवड रस्त्याला लागून असलेल्या संजीवन नाका परिसरात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हा रानगवा अवतरला. तो बिनधास्तपणे झाडीमध्ये चरत होता.रानगवा शहरात घुसल्याची वार्ता कळताच लोकांनी परिसरात गर्दी करायला सुरुवात केली.पण गर्दी वाढत चालल्याची चाहूल लागचाच रानगवा जंगलात पळाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top