पाच नद्यांचे वरदान असलेल्या वाडा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई

पालघर-जिल्ह्यातील बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, तानसा, पिंजाळ, देहर्जे, गारगाई या पाच नद्यांचे वरदान वाडा तालुक्याला लाभले आहे. मात्र यंदा याच तालुक्यात पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे.तालुक्यातील चार पाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून पाच पाड्यांना सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

तालुक्यातील धावरपाडा, नवापाडा,खडकपाडा आणि वंगण पाडा आदी ठिकाणच्या नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.याठिकाणी बोअरवेल मारून लघु नळपाणीपुरवठा योजना सुरू करावी,तसेच ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करावा,अशी मागणी ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे. सद्य परिस्थितीत तालुक्यातील टोकरे पाडा, जांभुळपाडा,घोडसाखरे, फणसपाडा ,तिळमाळ या गावांमध्ये आणि ओगदा गावातील पाच पाड्यांना दोन टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणीटंचाई साप्ताहिक अहवालात दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top