पाटणच्या हेळवाक आरोग्य केंद्राला टाळे लावण्याचा सरपंचांचा इशारा

कराड – सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना विभागात हेळवाकमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. पण या आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे आता हेळवाकच्या सरपंचांनी रुग्णालयाची स्थिती सुधारली नाही तर १ नोव्हेंबरपासून या आरोग्य केंद्राला टाळे लावण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात हेळवाकचे सरपंच व शिवसेना सातारा जिल्हा संघटक गजानन कदम यांनी सांगितले की, कोयना विभागासाठी हे प्राथमिक रुग्णालय एक जीवन संजीवनी आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासुन याठिकाणी निवासी डॉक्टर आणि कर्मचारी नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत अनेकदा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तक्रारी अर्ज दिले. तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे सद्य परिस्थितीत बदल झाला नाहीतर १ नोव्हेंबरपासून या रुग्णालयाला टाळे लावणार असल्याचा इशारा गजानन कदम यांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top