‘पार्ले-जी’वरील परिचित मुलीचा फोटो बदलला

  • कंपनीने केली मजेदार पोस्ट
    मुंबई

पार्ले-जी बिस्कीट कंपनीने त्यांच्या बिस्किटांच्या पाकिटावरील पार्ले-जी गर्लचा फोटो बदलला आहे. पार्ले-जी गर्लच्या जागी त्यांनी पाकिटावर युट्यूबर झरवान जे बनशाह याचा फोटो लावला आहे. हा बदललेला फोटो पार्ले-जीने त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्टदेखील केला आहे. बनशाह याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्याने “जर तुम्ही पार्लेच्या मालकाला भेटलात तर तुम्ही त्याला काय म्हणाल? पार्ले सर? मिस्टर पार्ले? की पार्ले जी?” असा प्रश्न विचारला होता.

बनशाह याने पोस्ट केलेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला. तसेच त्याच्या व्हिडिओने पार्ले-जीचे लक्षदेखील वेधून घेतले. याच पोस्टला उत्तर म्हणून पार्ले-जीने त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर एक मजेदार पोस्ट केली. त्यामध्ये पार्ले-जी बिस्किटांच्या पाकिटावर मुलीच्या जागी बनशाह याचा फोटो दिसत आहे. या पोस्टला त्यांनी कॅप्शन दिले आहे की, जोपर्यंत तुम्हाला पार्ले-जीच्या मालकाला काय म्हणायचे हे समजत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या आवडत्या बिस्किटासह एक कप चहाचा आनंद घेऊ शकता.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top