पालिकेच्या बाह्यरुग्ण विभागात यूपीआयद्वारे शुल्क भरता येणार

मुंबई – मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील ओपीडी अर्थात बाह्यरुग्ण विभागात १० रुपयांच्या पावतीऐवजी आता मोबाईलच्या माध्यमातून यूपीआय ॲपद्वारे शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. सुरुवातीला केईएम रुग्णालयात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
त्यानंतर काही दिवसांत पालिकेच्या अन्य रुग्णालयांत हा उपक्रम राबविला जाईल,अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांनी दिली.

डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले की,आता ओपीडी वेळेत जरी सुरू होत असली तरी केसपेपर आणि शुल्क भरण्यासाठी बरीच गर्दी सकाळी सात वाजल्यापासून रुग्णालयाच्या ओपीडीत दिसते.त्यामुळे शुल्क भरण्याचा कालावधी कमी व्हावा, म्हणून यूपीआय स्कॅनरची सुविधा केली जाणार आहे. यूपीआय ॲॅपच्या माध्यमातून शुल्क स्वीकारले जाऊ शकेल. त्यासाठी काही कर्मचाऱ्यांनाच रांगेच्या बाहेर यूपीआय स्कॅनर घेऊन उभे केले जाईल. ते ओपीडीत आलेल्या रुग्णांकडे जातील आणि यूपीआयच्या माध्यमातून शुल्क जमा करतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top