पुणे-नाशिक मार्गावर बस पुलावरून कोसळली

पुणे

पुणे-नाशिक महामार्गावर एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास सिन्नरजवळील गोंदे फाट्याजवळ ही बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली. या अपघातामध्ये १५ ते २० प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. ही बस पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात होती. अपघातानंतर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी जमली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू केले. बस अचानक पुलाखाली कोसळल्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघाताचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये बसभोवती नागरिकांची गर्दी जमल्याचे दिसत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top