पुणे मेट्रोच्या खर्चात २ हजार कोटींची वाढ

पुणे

पुणे शहरातील मेट्रोच्या खर्चात सुमारे २,००० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. करोनाच्या संसर्गामुळे झालेला विलंब, प्रकल्पाच्या जागेतील बदल आणि भूसंपादनाचा वाढता खर्च ही यामागची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाचा खर्च हा ११ हजार ४२० कोटीवरून १३ हजार कोटींहून अधिक झाला आहे, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिली.
या वाढत्या मेट्रोच्या खर्चाला मान्यता घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, असे मुरलीधरन यांनी सांगितले. मुरलीधरन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आमदार भीमराव तापकीर, संजय जगताप, रवीद्र धंगेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी या बैठकीत उपस्थित होते. १७ खात्यांच्या ४१ योजनांचा आढावा या बैठकीत घेतला. त्यावेळी पुण्यातील विविध पायाभूत विकास कामांचा आढावाही मुरलीधरन यांनी घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top