पुणे शहरात अग्नितांडव येरवडा, वाघोलीत आग

पुणे :

पुणे शहरात आगीच्या दोन घटना घडल्या. येरवड्यात लाकडी साहित्याच्या गोदामाला भीषण आग लागली, तर पुण्यात वाघोलीत वाहनांचे स्पेअर पार्ट असलेल्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येरवड्यात बालाजीनगर येथे लाकडी साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमनदलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या. या आगीत गोडाऊनमधील लाकडी साहित्य संपूर्ण पेटले होते. गोडाऊनमध्ये असणाऱ्या इतर साहित्याचेदेखील नुकसान झाले.

दुसरी आगीची घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली. वाघोलीत वाहनांचे स्पेअर पार्ट असलेल्या गोदामाला आग लागली. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. सुमारे तीन तासानंतर ही आग आटोक्यात आली. मात्र रात्री १० वाजता धूर दिसू लागल्याने अग्निशामक दलाला पुन्हा पाचारण करण्यात आले होते. गोदाम मोठे असल्याने आग लवकर आटोक्यात येत नव्हती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top