पुण्यातील फिनिक्स मॉलला भीषण आग

पुणे- पुण्याच्या विमान नगर भागातील फिनिक्स मॉलला आज दुपारी ३.१५ वाजता भीषण आग लागली. मॉलमध्ये बंद असलेल्या एका जुन्या रेस्टॉरंटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. त्यामुळे अग्निशमक दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचणी आल्या. अथक प्रयत्नानंतर जवानांनी संध्याकाळी ५ वाजता आग आटोक्यात आली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top