पुतीन यांचा विरोधकनेव्हलनी खडतर तुरुंगात

मॉस्को- रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा कट्टर विरोधक लेक्सी नेव्हलनी आता आर्कटिक सर्कलच्या उत्तरेतील एका तुरुंगात बंद केले आहे. सर्वात खडतर तुरुंग अशी या तुरुंगाची ओळख आहे. माॅस्कोपासून हा तुरूंग हजारो किलोमीटर दूर असून इथे कडाक्याची थंडी असल्याने कैद्यांचे अतिशय हाल होतात .
‘पोलर वुल्प’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या तुरुंगातील तापमान पुढील आठवड्यात उणे २८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हा तुरुंग रशियाच्या उत्तर-पूर्व खार्पमध्ये स्थित आहे. तर मॉस्कोपासून सुमारे १ हजार ९०० किलोमीटर अंतरावर आहे. नेव्हलनी यांचा प्रवक्ता किरा यारमिश यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगातील तापमान घटल्याने नेव्हलनी यांची तुरुंगात खूपच हाल होणार आहेत . नेव्हलीन यांना येत्या निवडणुकीत देखील सहभागी होता येणार नाही. या निवडणुकीपासून नेव्हलनी यांना दूर ठेवणे, हा रशियातील अधिकाऱ्यांचा कट आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top