पृथ्वीच्या वातावरणात परतला चांद्रयान-३ मधील एक भाग

बंगळुरू :

चांद्रयान-३ या यानाला पृथ्वीबाहेर पोहोचवणाऱ्या एलव्हीएम३ एम४ या रॉकेटचा एक भाग आता पृथ्वीच्या वातावरणात परत आला आहे. भारताची अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने याबाबत माहिती दिली.

इस्रोने सांगितले, आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार काल दुपारी २ वाजून ४२ मिनिटांनी रॉकेटचा एक भाग पृथ्वीच्या वातावरणात आला. हा भाग म्हणजे एलव्हीएम ३ रॉकेटचा क्रायोजेनिक वरचा भाग आहे. चांद्रयान-३ लाँच झाल्यानंतर सुमारे १२४ दिवसांमध्ये हा भाग पृथ्वीच्या कक्षेत परत आला.

चांद्रयान-३ मधील प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर हे चंद्रावर चिरनिद्रा घेत आहेत. मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्लीप मोडवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर चंद्रावर रात्र सुरू झाल्यामुळे हे दोन्ही डिव्हाईस फ्रीज झाले. पुन्हा सूर्योदय झाल्यानंतर लँडर-रोव्हरला सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, याला अपयश मिळाले. यानंतर हे मिशन पूर्णपणे संपल्याची घोषणा करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top