पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

मुंबई- आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्चा तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर झाला. उत्तर भारतासह महाराष्ट्रातदेखील पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरात ३६ पैशांनी तर डिझेलच्या दरात ३५ पैशांनी वाढ झाली. मध्य प्रदेशात पेट्रोल २५ पैशांनी तर डिझेल २२ पैशांनी महागले आहे. तसेच झारखंड, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. बिहारमध्ये पेट्रोल ३६ पैशांनी तर डिझेल ३४ पैशांनी स्वस्त झाले. पंजाबमध्ये पेट्रोल २७ पैशांनी तर डिझेल २९ पैशांनी स्वस्त झाले. छत्तीसगडमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top