प्रकृतीच्या अडचणींमुळे डेन्मार्कची राणी पायउतार

कोपनहेगन- डेन्मार्कची राणी मार्गारेट यांनी आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला असून रविवारी दुपारी झालेल्या एका औपचारिक कार्यक्रमात त्या आपल्या पदावरुन पायउतार झाल्या. तासाभरानंतर त्यांचा मुलगा फ्रेडरिक दहावा यांनी डेन्मार्कच्या राजेपदाची धुरा सांभाळली. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन इथे असलेल्या क्रिस्टीनबर्ग महालाच्या सज्जावरुन त्यांनी आपल्या प्रजेला दर्शन दिले.
डेन्मार्कच्या ९०० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच राणी पायउतार होत असून त्यानंतर राजा या पदावर आला आहे. ग्रेट ब्रिटनप्रमाणेच डेन्मार्कमध्येही राणीपदाऐवजी राजेपद कायम झाले आहे. राणी मार्गारेट या गेले काही महिन्यांपासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त होत्या. त्यांच्यावर गेल्या फेब्रुवारी महिन्यात एक शस्त्रक्रियाही झाली होती. त्यानंतर त्या विश्रांतीच घेत होत्या. नव्या वर्षाच्या स्वागत समारंभात राणी मार्गारेट यांनी पायउतार होण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र डेन्मार्कच्या जनतेने त्यांना पदावर राहण्याची विनंती केली होती. रविवारी त्यांनी आपला निर्णय घोषित केला. ग्रेट ब्रिटन मध्ये ज्या प्रकारे राज्यारोहण सोहळा होतो तसा डेन्मार्कमध्ये नसतो. त्याऐवजी डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी नवे राजे फ्रेडरिक यांची ओळख सर्वांना करुन दिली. त्यानंतर राजमहालाच्या सज्जावर येत नव्या राजाने अभिवादनाचा स्विकार केला. यावेळी हजारो डॅनिश लोकांनी आपल्या नव्या राजाचे स्वागत केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top