प्रसिद्ध तिरुपती बालाजीची संपती १८ हजार ८१७ कोटींवर पोहोचली

तिरुपती 
जगातील सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्ट तिरुमला तिरुपती बालाजी देवस्थानची एकूण संपत्ती एप्रिल २०२४ तिरुपती ट्रस्टची बँका आणि त्यांच्या विविध ट्रस्टमधील रोकड १८ हजार ८१७ कोटींवर पोहोचली. जी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक आहे. यावर्षी ११६१ कोटी रुपयांची सुरक्षा ठेव (एफडी) केली. त्यामुळे बँकांमधील एकूण एफडी १३ हजार २८७ कोटींवर पोहोचली आहे. ट्रस्टला एफडीवर व्याज म्हणून वार्षिक १६०० कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळते. 
ट्रस्टने नुकतेच १०३१ किलो सोने जमा केल्यानंतर आता ट्रस्टचे ११३२९ किलो सोनेही बँकांमध्ये जमा झाले आहे.  अहवालानुसार ट्रस्ट हा देशातील एकमेव हिंदू धार्मिक ट्रस्ट आहे, जो गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने ५०० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रुपयांच्या ठेवी जमा करत आहे.  तिरुपती ट्रस्टच्या मुदत ठेवी वर्षानुवर्षे वाढत आहेत. २०१३ मध्ये ६०८ कोटी रुपये,२०१४ मध्ये ९७० कोटी,२०१५ मध्ये ९६१ कोटी, २०१६ मध्ये ११५३ कोटी, २०१७ मध्ये ७७४ कोटी, २०१८ मध्ये ५०१ कोटी रुपयांच्या एफडी होत्या. कोरोनाच्या काळात गेल्या 12 वर्षांत प्रथमच ट्रस्टची एफडीची रक्कम कमी झाली होती. २०१९ मध्ये २८५ कोटी रुपये, २०२० मध्ये ७५३ कोटी रुपये, २०२१ मध्ये २७० कोटी रुपये आणि २०२२ मध्ये २७४ कोटी रुपयांच्या एफडी होत्या. गेल्या वर्षी ट्रस्टने ७५७ कोटी रुपयांची एफडी केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top