फ्लोरिडामध्ये सूर्यास्ता वेळी दुरंगी आकाश दिसले

फ्लोरिडा

फ्लोरिडामध्ये काल सूर्यास्तावेळी दुहेरी रंगाचे आकाश पाहायला मिळाले. ही निसर्गाची कमाल पाहून फ्लोरिडातील लोक आश्चर्यचकित झाले. त्यांनी हे क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत आकाशाची एक बाजू लाल- पिवळी तेजोमय, तर दुसरी बाजू निस्तेज आणि गडद दिसत आहे. या घटनेला प्स्लिट स्काय असे म्हटले जाते. हा व्हिडिओ एक्सवर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. मी असा आविष्कार याआधी कधीच पहिला नाही असे एका नेटकऱ्याने म्हटले. सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी असल्यासारखे वाटते, असेही एकाने म्हटले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top