बबनराव घोलपांचा शिंदे गटात प्रवेश ?

मुंबई – माजी मंत्री बबनराव घोलप शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बबनराव घोलप प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आले आहे. शिर्डीची उमेदवारी न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून बबनराव घोलप नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. घोलप यांच्यासोबत आणखी काही पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची शक्यता आहे. घोलप आज पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, माझ्यावर अन्याय झाला आहे. याबाबत मी खासदार संजय राऊत यांना सांगितले होते. मी राजीनामा देऊन दोन महिने झाले आहेत. तेव्हापासून मला कोणीही संपर्क साधला नाही. मिलिंद नार्वेकर कोण आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात आहे. आम्ही ५० वर्ष कामे केली. मात्र आमचे ऐकून घेतले जात नाही. पक्ष फुटतो तरी देखील त्यांचेच ऐकतात. त्यांना एवढे महत्त्व का देतात. मला संपर्कप्रमुख पदावरून का काढले? याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top