बलसाड एक्स्प्रेसमध्ये स्फोट रेल्वे हेड कॉन्स्टेबल मृत्युमुखी

मुझफ्फरपूर- उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूर जंक्शनच्या फलाट क्रमांक ५ वर आज सकाळी उभ्या असलेल्या बलसाड एक्सप्रेसमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागली.ही आग विझवताना झालेल्या सिलेंडर स्फोटात एक आरपीएफ हेड कॉन्स्टेबल शहीद झाला.विनोदकुमार यादव असे आरपीएफ हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे.

आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बलसाड एक्स्प्रेस ही गाडी मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकाच्या ड्युटी फलाट क्रमांक पाचवर आली.गाडी थांबल्यानंतर काही वेळातच एस-आठ बोगीच्या शौचालयात आग लागल्याचे दिसून आले.या घटनेची माहिती मिळताच आरपीएफ,जीआरपी आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी वैद्यकीय पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी हेड कॉन्स्टेबल विनोद कुमार हे अग्निशमन सिलेंडर घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. यात गंभीरपणे भाजून विनोदकुमार यांचा मृत्यू झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top