बाल्टीमोर पुल दुर्घटना दोघांना वाचवण्यात यश

बाल्टीमोर
अमेरिकेतील बाल्टीमोर शहरात झालेल्या पुल दुर्घटनेत आज दोघांना वाचवण्यात यश आले आहे. पाटाप्स्को नदीवरील स्कॉट पूल बुधवारी जहाजाने धडक दिल्यानंतर कोसळला होता. यावेळी या पुलावर असलेला एक मालवाहू ट्रक पाण्यात पडला होता. त्यात काही जण बेपत्ता झाले होते. त्यातील दोघांना आज वाचवण्यात आले असून त्यापैकी एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जहाजाने धडक दिल्यानंतर हा लाल रंगाचा ट्रक पाण्यात पडला होता. सध्या नदीचे पाणी अत्यंत थंड असून त्यातून या दोघांना वाचवण्यात आले असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. यामध्ये बेपत्ता झालेल्या सहा जणांचा मृत्यु झाला असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेत मेक्सिको, ग्वाटेमाला, होंड्रुस आणि इल सॅल्वेडोर येथील असल्याची माहिती अग्निशमन दलाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. या ठिकाणचे पाणी अत्यंत थंड आहे. तसेच या पुलाचे अनेक भाग हे पाण्यात पडलेले असल्याने बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात अडचण येत असल्यामुळे सध्या हे शोधकार्य थांबवण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top