‘बासमती’ला मिळाला जगातील सर्वोत्कृष्ट तांदळाचा पुरस्कार

लंडन- भारतातील बासमती तांदळाला “जगातील सर्वोत्कृष्ट तांदूळ” म्हणून गौरविण्यात आले आहे. ‘टेस्ट अ‍ॅटलस ‘ या संस्थेद्वारे २०२३ -२४ च्या वर्षअखेरीच्या पुरस्कारांचा एक भाग म्हणून ही घोषणा करण्यात आली आहे.’टेस्ट अ‍ॅटलस ‘ ही लोकप्रिय भोजन व प्रवासी मार्गदर्शन करणारी संस्था आहे. बासमती तांदळाबरोबर मँगो लस्सी हे जगातील सर्वोत्तम दुग्धजन्य पेय असल्याने या संस्थेने जाहीर केले आहे.
‘टेस्ट अ‍ॅटलस’ ने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “बासमती ही एक लांब दाणा असलेली तांदळाची प्रजाती आहे.जी मूलतः भारत आणि पाकिस्तानमध्ये पिकवली जाते.या तांदळाचे वैशिष्ट्य त्यांची चव आणि सुगंध आहे. याचा अन्न म्हणून प्रामुख्याने वापर केला जातो.याच्यापासून बनवलेला भात बराच काळ सुट्टा राहतो.ज्यामुळे त्याला विविध खाद्यपदार्थांच्या रेसीपीमध्ये आणि त्याचे खास पदार्थ करताना वापरला जातो.सर्वोत्तम बासमती धान्यांचा रंग किंचित सोनेरी असतो. एकदा शिजल्यावर बासमतीचे दाणे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवतात,ते एकत्र चिकटत नाहीत.
बासमती खालोखाल इटलीतील आर्बोरियो आणि पोर्तुगालच्या कॅरोलिनोतील तांदळाचा दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो. त्यानंतर स्पेन आणि जपानमधील तांदळाच्या वाणांचाही पहिल्या पाच क्रमांकांमध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे ‘टेस्ट अ‍ॅटलस’ ने जागतिक पाककृतीच्या सर्वसमावेशकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतातील मँगो लस्सीला “जगातील सर्वोत्कृष्ट दुग्धजन्य पेय” म्हणून सन्मानित केले आहे. जगभरातील भारतीय रेस्टॉरंट्सच्या मेनूमध्ये या आंब्याच्या गोड लस्सीचे विशेष कौतुक केले गेले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top