बिहारच्या सामाजिक न्यायाची जबाबदारी आता इंडियाची

*राहुल गांधी यांची घोषणा
पुर्णिया
इंडिया आघाडीने बिहारमध्ये सामाजिक न्यायाची जबाबदारी घेतली असून त्यासाठी आम्हाला नितीश कुमार यांची काहीच गरज नाही, असे मत काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते आज भारत जोडो न्याय यात्रेच्या बिहारमधल्या दुसऱ्या दिवशी पुर्णिया इथे जनसभेला संबोधित करत होते.
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या बिहारमधून आपला प्रवास करत आहे. आज त्यांनी पुर्णिया इथे जनसभेला संबोधित केले. देशातल्या वाढत्या बेरोजगारीविषयी त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. बिहारमधल्या जातनिहाय जनगणनेचे समर्थन करतांनाच भाजपा देशात द्वेषाचे राजकारण करत असून सामाजिक आणि आर्थिक न्यायापासून लोकांचे लक्ष विचलित करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुर्णिया इथल्या त्यांच्या जनसभेला आज लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांनी धाब्यावर इथल्या स्थानिक शेतकऱ्यांबरोबर चहापान केले व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांना शेतकऱ्यांनी पारंपारिक मुंडासे दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top