बुलेट ट्रेनच्या ट्रॅकचे काम युद्धपातळी सुरू

-रेल्वेमंत्र्यांची पोस्ट
मुंबई
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम युद्धपातळीवर सुरू असून या कामाचा आढावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सतत घेत आहेत. आज त्यांनी या बुलेट ट्रेनच्या बॅलेस्टलेस ट्रॅकचा व्हिडिओ एक्सवर शेअर केला. या व्हिडिओतून बुलेट ट्रेनसाठी बॅलेस्टलेस ट्रॅकचे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे की, बॅलेस्टलेस ट्रॅक हा असा ट्रॅक आहे की हायस्पीड ट्रेनचे वजन पेलू शकतो. बॅलेस्टलेस ट्रॅकला खडी आणि काँक्रीटच्या अँगलची आवश्यकता नसते. या ट्रॅकवर ताशी ३२० किमीचा वेग असेल, यापैकी १५३ किलोमीटरच्या व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले असून २९५.५ किमी पुलाचे कामही पूर्ण झाले आहे.
दरम्यान, या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपान सरकार मदत करत आहे. बुलेट ट्रेनचे कॉरिडॉरचे ऑपरेशन कंट्रोल सेंटर साबरमती आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या बांधकामावर सातत्याने काम करत आहे. बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलीमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई येथे स्थानके असतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top