बोईंगचे सीईओ कॅल हॉन वर्षाखेरपर्यंत पायउतार

  • विमान सुरक्षिततेबाबत प्रश्नांमुळे निर्णय
    वॉशिंग्टन
    बोईंग या जगातील मोठ्या विमाननिर्मिती कंपनीचे सीईओ डेव कॅलहॉन चालू वर्षीच्या शेवटापर्यंत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. विमान उत्पादन प्रक्रिया व सुरक्षिततेच्या संबंधातील काही विवादास्पद घटनांमुळे कंपनी व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार कॅलहॉन यांना यंत्रणांकडून तपास आणि चौकशीला सामोरे जावे लागणार असून त्यामुळे पायउतार व्हावे लागणार आहे.

या संदर्भात कॅलहॉन यांनी कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, आत्ता संपूर्ण जगाची नजर आपल्यावर आहे. मला खात्री आहे की या परिस्थितीत आपण जगातील उत्तम कंपनी म्हणून समोर येऊ. आपण जे काही करू त्यात सुरक्षितता आणि गुणवत्तेला अग्रक्रम देणे ही आपली सगळ्यात पहिली जबाबदारी आहे. बोईंगने निर्मिलेल्या अलास्का एअरलाईन्सच्या १७१ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाला जानेवारी महिन्यात अपघात झाल्यानंतर सुरक्षिततेच्या अनुषंगाने कंपनीच्या निर्मितीप्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले होते, तेव्हापासून कंपनीकडून विमान उत्पादन बंद ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top