‘बोर्नव्हिटा’आरोग्यदायी पेय नाही केंद्राच्या वाणिज्य खात्याची माहिती

नवी दिल्ली- बोर्नविटा हे नाव सर्वांनाच परिचित आहे. बोर्नविटा हे लहान मुलांचे आवडते पेय मानले जाते.हे पेय प्यायल्याने मुले अगदी
उंच आणि धष्टपुष्ट होतात, अशी जाहिरातही केली जाते.मात्र आता केंद्र सरकारने यापुढे बोर्नव्हिटा हे आरोग्यदायी पेय मानले जाणार नसल्याचे जाहीर केले.आरोग्यदायी पेयाच्या श्रेणीतून बोर्नव्हिटाला हटवावे असे आदेश केंद्राच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सर्व ई-कॉमर्स वेबसाइटना दिले आहेत.

केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार,बाल हक्क संरक्षण आयोगाच्या कायदा आयोगाने ठरवून दिलेल्या नियम आणि नियमांतर्गत आरोग्यदायी पेयाची कोणतीही व्याख्या नाही.
आयोगाने गठीत केलेल्या समितीने सीपीसीआर कायदा २००५ च्या कलम १४ अंतर्गत तपास केला. यानंतर असे ठरले की एफएसए कायद्यांतर्गत कोणत्याही आरोग्य पेयाची व्याख्या करण्यात आलेली नाही.मुळात बोर्नव्हिटामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याचे आढळते.ते प्यायल्याने तब्येत आणखी खराब होवू शकते.या निष्कर्षानंतरच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने या महिन्याच्या सुरुवातीला ई-कॉमर्स वेबसाइट्सना आरोग्यदायी पेय किंवा एनर्जी ड्रिंक्सच्या श्रेणीत डेअरी, धान्य-आधारित पेये सूचीबद्ध करू नयेत असे सांगितले होते. सरकारने असा युक्तिवाद केला की हेल्थ ड्रिंक या शब्दाची भारताच्या अन्न कायद्यात व्याख्या केलेली नाही तर एनर्जी ड्रिंक हे फक्त चवीनुसार पूर्ण पाणी आधारित पेय आह़े.त्यामुळे आरोग्यदायी पेय असे चुकीचे शब्द वापरल्याने ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते.तरी वेबसाइट्सना अशा जाहिराती काढून टाकण्यास किंवा सुधारण्यास सांगितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top