‘ब्रिक्स’ राष्ट्रांच्या गटात सामील होण्यासाठी पाकिस्तानचा अर्ज

मॉस्को- आर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान आता पुढील वर्षी ब्रिक्स संघटनेचे सदस्यत्व मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे.तसा पाकिस्तानने रितसर अर्जही केला आहे.
त्यासाठी पाकिस्तानने रशियाची मदत मागितली आहे

विकसनशील देशांची संघटना असलेल्या ब्रिक्सच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आता त्यात सामील होण्यासाठी अर्ज केला आहे.रशियाच्या ‘टास’ या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.रशियामधील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी अर्ज भरण्यासोबतच ब्रिक्समध्ये सदस्यत्व मिळवण्यासाठी रशियाची मदत मागितली आहे. पाकिस्तानने २०२४ मध्ये ब्रिक्स संघटनेचे सदस्यत्व मिळविण्यासाठी रशियाकडून मदत मिळण्याची आशा व्यक्त केली आहे.यावर्षी ब्रिक्समधील सदस्यांची संख्या वाढली आहे. ब्राझील,रशिया,भारत,चीन आणि दक्षिण आफ्रिका हे संस्थापक सदस्य असलेल्या ब्रिक्स आघाडीने या वर्षी आपल्या सदस्यांची संख्या ११ पर्यंत वाढवण्याची घोषणा केली.अर्जेंटिना, इजिप्त,इथिओपिया,इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा समूहाचे नवीन सदस्य म्हणून समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.आतापर्यंत पाकिस्तानने ब्रिक्सच्या विस्ताराकडे लक्ष दिले नव्हते.पण आता बदलत्या परिस्थितीत पाकिस्तान ब्रिक्समध्ये सहभागी होण्यासाठी रशियाच्या मदतीने प्रयत्न करत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top