ब्लड कॅन्सरवर भारतीय डॉक्टरांनी कमी खर्चाचे उपचार शोधले

  • बाळासाहेब थोरातांचा जावयाचेही योगदान

मुंबई :

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईने (आयआयटी मुंबई) ब्लड कॅन्सरवर उपचारासाठी जेनेटिक उपचार पद्धती विकसित केली आहे. भारतात प्रथमच विकसित करण्यात आलेल्या उपचार पद्धतीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने मान्यता दिली आहे. आयआयटी मुंबईचे डॉ. राहुल पुरवार यांनी ही उपचार पद्धत शोधली आहे. या संशोधनात टाटा हॉस्पिटलचे डॉ. हसमुख जैन यांनीही योगदान दिले आहे. डॉ. हसमुख जैन काँग्रेस नेते माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे जावई आहेत. या उपचार पद्धतीला मान्यता मिळाल्याची माहिती थोरात यांनी ‘एक्स’वर दिली.

ब्लड कॅन्सर असणाऱ्या रुग्णांवर शेवटच्या टप्प्यात कोणतेच उपचार परिणामकारक ठरत नाहीत. अशा वेळी रुग्णाच्या रक्तातील पांढऱ्या पेशी काढून त्यांच्यावर उपचार केले जातात. अमेरिकेत या उपचार पद्धतीचा प्राथमिक टप्पा उपलब्ध होता. पण त्याला सुमारे ४ कोटी रुपये इतका खर्च येतो. आयआयटी मुंबई आणि टाटा हॉस्पिटल यांनी १० वर्षं संशोधन करून ही उपचार पद्धत भारतात उपलब्ध केली आहे. अमेरिकेच्या तुलनेत फक्त १० टक्के खर्चात हे उपचार भारतात उपलब्ध झाले आहेत, असे थोरात यांनी म्हटले आहे. या उपचाराची चाचणी टाटा हॉस्पिटलमध्ये झाली, यात ७० टक्के रुग्णांवर सकारात्मक परिणाम झाल्याचेही दिसून आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top