भांडुपमध्ये होणार फ्लेमिंगो पार्क केंद्राची मंजुरी! भूमिपूजन संपन्न

मुंबई- भांडुप पंपिंग स्टेशन परिसर आता पर्यटन स्थळ म्हणून नावारुपास येणार आहे. कारण याठिकाणी फ्लेमिंगो पार्क उभारले जाणार असून त्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता या प्रकल्पाचे भूमिपूजनही खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.

या फ्लेमिंगो पार्क प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये फेरी बोटसेवा, फ्लोटिंग जेट्टी, सौरदिवे, उद्यानासाठी बाके आणि जेट्टीकडे जाणारे रस्ता आदी कामाचा समावेश आहे. खासदार मनोज कोटक यांनी २०१९ मध्ये ही संकल्पना संसदेत मांडली होती. फ्लेमिंगो हे विदेशी पक्षी दरवर्षी थंडीच्या मोसमात हजारो किमीचा प्रवास करून भांडुप पंपिंग स्टेशन येथील खाडी भागात स्थलांतर करत असतात. या पक्ष्यांना पाहण्यासाठी पक्षी निरीक्षकांसह पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top