भाईंदरमधील नारायणा शाळेतील शुल्कवाढी विरोधात पालक आक्रमक

भाईंदर – शहराच्या पश्चिमेला असलेल्या नारायणा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मनमानीपणे शुल्कवाढ करून जबरदस्तीने त्याची वसुली केली जात असल्याने पालकवर्ग आक्रमक झाला आहे. या संतप्त पालकांनी मंगळवारी तर शाळेत घेराव घालून व्यवस्थापनाचा निषेध केला. अखेर आता पालक आणि मुख्याध्यापक यांच्यात याबाबत बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

भाईंदर शहरातील तहसीलदार कार्यालय ते स्मशानभूमी या मार्गावर नारायणा ही इंग्रजी सीबीएसई बोर्डाची शाळा आहे. याच शाळेच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांंना मनमानीपणे वाढीव शुल्क आकारले आहे. त्याच्या वसुलीसाठी दबावतंत्रही वापरले जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे पालकांनी घेराव घालून आपला संताप व्यक्त केला. वाढीव फी पैकी ५० टक्के फी पहिल्याच महिन्यात आगाऊ स्वरूपात भरण्याचे फर्मान शाळा व्यवस्थापनाने काढले आहे. त्यामुळे पालकवर्ग हवालदिल झाला आहे. याबाबत पालकांनी व्यवस्थापन आणि शिक्षण विभाग,पालिका आयुक्त आणि तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र कुणीही याची दखल घेतली नसल्याने अखेर पालकांनी घेराव घालून हा आपला संताप व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top