भाजपाकडून २५ विदेशी पक्षांना निवडणूक पाहण्यासाठी आमंत्रण

नवी दिल्ली- भारतात १९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपाने भारतातील निवडणूक प्रक्रिया आणि भाजपाची प्रचाराची रणनीती परदेशी पक्षांना समजावून सांगण्याच्या उद्देशाने, जगभरातील २५ राजकीय पक्षांना आमंत्रित केले आहे. यामध्ये अमेरिका, चीन व पाकिस्तानचे पक्ष समाविष्ट नाहीत.
पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी सुरू केलेल्या ‘नो बीजेपी’ अर्थात ‘भाजपाला जाणून घ्या’ या उपक्रमांतर्गत भाजपने हे पाऊल उचलले आहे. यात ब्रिटनचे कंझर्व्हेटिव्ह आणि लेबर पक्ष, जर्मनीचे ख्रिश्चन डेमोक्रॅट्स आणि सोशल डेमोक्रॅट्स पक्ष, बांगलादेशचा अवामी लीग पक्ष आणि नेपाळ व श्रीलंकेतील प्रमुख राजकीय पक्षांचा समावेश आमंत्रितांमध्ये आहे. आतापर्यंत १३ राजकीय पक्षांनी भाजपचे निमंत्रण स्वीकारले आहे.
या दरम्यान त्यांना भारताची निवडणूक प्रक्रिया, राजकीय रचना आणि राजधानी दिल्लीतील भाजपाबद्दल सांगितले जाईल. यानंतर ५-६ निरीक्षकांसह एक गट तयार करून त्यांची विविध मतदारसंघातील पक्षश्रेष्ठींशी ओळख करून दिली जाणार आहे. याशिवाय, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षप्रमुख नड्डा यांसारख्या भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांच्या रॅलींना देखील उपस्थित राहू शकतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top