भाजपाचा जळगावतील उमेदवार बदलणार?

जळगाव- जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाने खासदार उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीवरून नाराज असल्याने उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी त्यांच्या सोबत असेलेले करण पवार यांना उध्दव ठाकरेंनी जळगावातून उमेदवारी जाहीर केली. करण पवार यांना उमेदवारी जाहीर होताच जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांनी तातडीने गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये जळगावातील उमेदारीबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता भाजपाचा जळगावातील उमेदवार बदलणार का, तसेच स्मिता वाघ यांचे तिकीट कापले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top