भाजपाला पाठिंबा दिल्याबद्दल लंडनमध्ये भारतीय विद्यार्थ्याशी गैरवर्तन

लंडन- भाजपाला पाठिंबा दिल्याबद्दल ‘इस्लामोफोबिक’ म्‍हणत गैरवर्तन केल्याचा आरोप लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (एलएसई) मधील एका भारतीय विद्यार्थ्याने केला आहे. सत्यम सुराणा असे त्याचे नाव आहे. विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीतील प्रचारावेळी ‘फॅसिस्ट’ म्‍हणूनही संबाेधित करण्‍यात आल्‍याचे सुराणा याने ‘माध्यमांना सांगितले. मागील वर्षी भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तानी समर्थकांनी केलेल्या हल्ल्या वेळी जमिनीवर पडलेला तिरंगा उचल्‍याने सुराणा प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

सुराणाने आरोप केला की, विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू होण्याच्या काही तास आधी माझ्या विरोधात मोहीम सुरू करण्यात आली. विरोधकांनी मला भाजपशी जोडले. तसेच बहिष्कार टाकण्यासाठी मला ‘फॅसिस्ट’ असे संबोधले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या निवडणुका फेब्रुवारी आणि मार्च महिन्‍याच्‍या सुरुवातीला जाहीर झाल्या. मी सरचिटणीस पदासाठी निवडणूक अर्ज भरला. १४ ते १५ मार्चमध्ये माझे पोस्टर फाडले. याबाबत आम्ही अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. १६ मार्च रोजी आम्ही आमचे पोस्टर बदलले. तेव्हाही काही पोस्टर खराब झाल्याचे आमच्या लक्षात आले. १७ मार्च राेजी दुपारी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या सर्व साेशल मीडिया ग्रूपमध्‍ये मेसेज आले होते की, ‘हा सत्यम सुराणा भाजप समर्थक आहे, तो फॅसिस्ट व्यक्ती आहे, इस्लामोफोब आहे, ट्रान्सफोब आहे.’ हे संदेश भारत सरकारसाठी अत्यंत वादग्रस्त होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top