भारताचा २६ टक्के भाग दुष्काळाने व्यापला आहे!

अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अहवाल

वॉशिंग्टन

ऑक्टोबर महिन्यात भारतातील बऱ्याच भागांमध्ये दुष्काळाने थैमान घातले आहे. भारताच्या उत्तर, पूर्व आणि किनारपट्टीच्या नैऋत्य भागात दुष्काळी परिस्थितीची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भारताचा २६.३ टक्के भाग दुष्काळाने व्यापला आहे. राष्ट्रीय पर्यावरण माहिती केंद्र व अमेरिका हवामान एजन्सी नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या युनीटने ही माहिती दिली आहे.

राजस्थान आणि पंजाब वगळता, जवळपास सर्व राज्यांना दुष्काळाने ग्रासलेले भाग आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. ऑक्टोबरमध्ये दुष्काळाची परिस्थिती गंभीर झाली कारण सप्टेंबरपर्यंत देशाचा २१.६ टक्के भाग दुष्काळाने ग्रासला होता. अमेरिकेच्या हवामान संस्थेनुसार २६ टक्के पेक्षा जास्त भारत दुष्काळाचा सामना करत आहे. गेल्या महिन्यातील आकडेवारीपेक्षा हे जास्त आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top